ठाणे- भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीच सौ. ४२० निघाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या सौ. ४२० महिलेने उल्हासनगरात राहणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत गंडा घातल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी तिला अटक केली आहे.
किरण दिलीप फुंदे असे पोलिसांनी अटक केलेल्या सौ. ४२० चे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने गेल्या 5 वर्षांत 7 जणांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून लाखोंचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील प्रबुद्ध नगर येथे पूजा खरात ही 23 वर्षीय विद्यार्थिनी राहते. तिला वर्षभरापूर्वी नोकरीची नितांत गरज होती. ही गोष्ट हेरून भाजप पदाधिकारी दिलीप फुंदे यांच्या पत्नी किरण हिने ते हेरले. तिने 17 जानेवारी 2018 ला पूजाला ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्याचे काम देण्यासाठी 75 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही. त्यामुळे पूजाचे वडील तात्या खरात यांनी किरण फुंदेंकडे पैशाची मागणी केली असता, खरात यांच्या नावे आरोपी महिलेने 60 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, तोही बाद केला. अखेर आपली फसवणूक झाली आहे, हे समजल्यावर पूजा खरात हिने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठत किरण फुंदे हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.