महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंदिरे उघडण्याच्या निर्णयानंतरही राम कदमांची टीका सुरूच

दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे आणि धार्मिक प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतरही भाजपकडून महाविकास आघाडीसरकारवर टीका करण्यात येत आहे.

राम कदमांची टीका सुरूच
राम कदमांची टीका सुरूच

By

Published : Nov 14, 2020, 5:28 PM IST

मुंबई - येत्या सोमवारी दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या तीन महिन्यात मंदिर उघडण्याची मागणी करत भाजप तसेच इतर पक्ष व संघटनांनी आंदोलने केली होती. यानंतर अखेर आता सरकारने मंदिर उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिर उघडल्यानंतरही भाजपचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही. मंदिर उघडण्याच्या निर्णयानंतरही भाजप नेत्यांनी टीका केलेली आहे.

आंधळे बहिरे सरकार ऐकायला तयार नव्हते-

गेल्या तीन महिन्यांपासून भाजप तसेच इतर संघटना मंदिर उघडण्यासाठी मागणी करत होते. मात्र हे कुंभकर्णाच्या निद्रेत झोपलेलं सरकार मंदिरांबाबत आता जागे झालेले आहे. गेले तीन महिने रस्त्यावर उतरून लोक घंटा वाजवत मंदिर उघडण्याची मागणी करत होते. मात्र, हे आंधळे बहिरे सरकार ऐकायला तयार नव्हते, अशी टीका आमदार राम कदम यांनी केली आहे.

राम कदमांची टीका सुरूच

गेल्या तीन महिन्यांपासून या मागणीसाठी भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रस्त्यावर उतरून तसेच घंटानाद करत भाजप आध्यात्मिक आघाडीने आंदोलन केली. राज्यपालांची देखील याबाबत भेट घेतली. मात्र कोरोनाची भीती असल्याने सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय अजूनही घेतला नव्हता. मात्र अखेर आज मुख्यमंत्री यांनी सोमवारपासून पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यावर भाजप नेते राम कदम यांनी टीका केलेली आहे.

जनतेचा विजय आणि सरकारचे अपयश-

राम कदम म्हणाले की, गेले तीन महिने रस्त्यावर उतरून लोक घंटा वाजवत मंदिर उघडण्याची मागणी करत होते. तुम्ही नियम लागू करत ठेवून मंदिर उघडा ही मागणी करत होते. मात्र हे आंधळे आणि बहिरे अहंकारी सरकार ऐकायला तयार नव्हते. यामुळे लोक संतापले होते. सर्वत्र या राज्य सरकारच्या निषेध व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळेच महाराष्ट्राच्या सरकारला मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे हा जनतेचा फार मोठा विजय आहे आणि या सरकारचे अपयश आहे, असे कदम यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details