महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप पदाधिकाऱ्याचा प्रताप; अत्याचार पीडित तरुणीच्या दुचाक्या जाळल्या

भाजप कल्याण  शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी (वय 41)याला अल्पवयीन तरुणीवर ४ वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 45 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याने तरुणीला गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणे सुरू केले. येथेच न थांबता त्याने तरुणीच्या घराबाहेरील गाड्या जाळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

bjp
आरोपी संदीप गोपीनाथ माळी

By

Published : Dec 9, 2019, 8:55 PM IST

ठाणे - अल्पवयीन तरुणीवर ४ वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याने तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तरुणीच्या घराबाहेर तिच्या दुचाक्या जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कल्याण शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गोपीनाथ माळी (वय 41), असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर केल्याने खळबळ माजली होती. गेल्या ४ वर्षांपासूनतोबंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत होता. यासंदर्भात पीडित तरुणीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हे शाखेने संदीप माळी याला शनिवारी 17 ऑगस्टला पाहाटे महाबळेश्वर येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले असता 45 दिवसांनी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. त्याने तरुणीला गुन्हा मागे घेण्यासाठी धमक्या देणे सुरू केले. येथेच न थांबता त्याने तरुणीच्या घराबाहेरील गाड्या जाळल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात आठवड्यापूर्वी तक्रार दाखल केली होती. चौकशी करून कारवाई करू, असे पोलीस सांगत असल्याचे पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर कथन केले होते. देशभरात वातावरण खराब असल्याचे कारण देत पोलीस या प्रकरणाबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. उन्नाव घटनेसारखे मला जाळल्यानंतर पोलीस कारवाई करणार का, असा उद्विग्न सवाल या तरुणीने उपस्थित केला होता.

तर, दुसरीकडे, 'दीड कोटी रुपये दे, प्रकरण मिटवून टाकू' अशी मागणी संबंधित तरुणी आणि तिच्या आईने केल्याचा आरोप संदीप माळी याने केला आहे. त्यानेही मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीविरुद्ध खंडणी मागत असल्याची तक्रार केली आहे. दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली असली, तरी संदीप माळी याच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीबाबत भाजपने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details