महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप नगरसेवकाला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांचे घरीच अलगीकरण करून उपचार सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. परंतु आता मीरा भाईंदरमध्ये लोकप्रतिनिधीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता भाजप नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

Corona
भाजप नगरसेवक

By

Published : Jul 2, 2020, 8:54 PM IST

मीरा भाईंदर ( ठाणे ) - कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मीरारोडमधील भाजप नगरसेवक संजय थेराडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. सध्या मिरारोडच्या वोकार्ड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिरा भाईंदर महापालिका

बुधवारी मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांचे घरीच अलगीकरण करून उपचार सुरू आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होत होती. परंतु आता मीरा भाईंदरमध्ये लोकप्रतिनिधीच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या अगोदर सुद्धा एका भाजप नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली होती. तर ९ जूनला शिवसेनेच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन झाल्याचे अहवालातून समजले होते.

भाजप नगरसेवक संजय थेराडे यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांपूर्वी लक्षणे होती, आता नाहीत.."प्रकृती बरी आहे, लक्षणे नसल्यामुळे लवकरच बरा होऊन जनतेच्या सेवेत दाखल होणार असल्याची प्रतिक्रिया संजय थेराडे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details