ठाणे - भिवंडीत इमारत संकुलातील अनधिकृत बांधकामासह मोकळ्या जागेतील जैन मंदिरा संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पालिकेस कारवाई करण्यास भाग पाडणाऱ्या तक्रारदारास भाजपा नगरसेवकाने मारहाण केली. नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी भिवंडीतील अंजुरफाटा भागात घडली असून मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विनेश कांतीलाल गुढका (वय 52) असे मारहाण झालेल्या तक्रादाराचे नाव आहे.
महावीर रेसिडेंसीमधील इमारतीमध्ये राहणारे विनेश गुढका यांनी बिल्डरने पालिका बांधकाम परवानगी शिवाय अधिक अतिक्रमण करून बांधकाम केल्या बाबतची तक्रार पालिकेकडे केली. त्याची शहानिशा करून या ठिकाणी कंपाऊंड भिंतीसह काही इमारतीमध्ये अतिरिक्त बांधकामा व मोकळ्या जागेत जैन मंदिर हे अनधिकृत बनविल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी पालिकेचे पथक घटनास्थळी कंपाऊंडची भिंत तोडत असताना त्या ठिकाणी स्थानिक भाजपा नगरसेवक निलेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित तक्रारदार विनेश गुढका यांना शिवीगाळ व हाणामारीत केली. त्यामध्ये भाजपा नगरसेवक निलेश चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनेश गुढका याला बेदम मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे तक्रादार भयभीत झाले आहे.
न्यायालयीन वाद विवाद
विनेश गुढका यांनी बिल्डर किशोर जैन यांच्याकडून महावीर कॉम्प्लेक्समध्ये एक सदनिका 2012 मध्ये खरेदी केली होती. परंतु तिचा ताबा मुदतीत न दिल्याने 2015 मध्ये फ्लॅटचा ताबा घेऊन त्यानंतर ग्राहक न्यायालयात बिल्डर विरोधात तक्रार केली. न्यायालयाने 12 लाख 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला होता. परंतु बिल्डरने आदेशानंतरही पैसे देण्यास नकार दिल्याने विनेश गुढका यांनी येथील अनधिकृत बांधकामा संदर्भात आवाज उठवला होता. त्याच रागातूनही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.
'जैन मंदिरास हात लावू देणार नाही'