महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई महापालिका निवडणूक मतदार यादीत घोळ असल्याचा भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरोप - नवी मुंबई मतदार यादी बातमी

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होण्याआधीच मतदार याद्यामध्ये जाणीव पूर्वक आणि पैसे देऊन घोळ केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. ५०० रु घेऊन अधिकाऱ्यांनी घोळ केल्याचा आरोप भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केल्यानंतर आता १५०० रु प्रत्येकी नावाचे घेऊन याचे जाणूनबुजून मतदार याद्यात फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी वाशीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे

NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पत्रकार परिषद

By

Published : Mar 5, 2021, 3:59 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक होण्याआधीच मतदार याद्यामध्ये जाणीव पूर्वक आणि पैसे देऊन घोळ केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. ५०० रु घेऊन अधिकाऱ्यांनी घोळ केल्याचा आरोप भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी केल्यानंतर आता १५०० रु प्रत्येकी नावाचे घेऊन याचे जाणूनबुजून मतदार याद्यात फेरफार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी वाशीत पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यामुळे नवी मुंबई मनपाची होऊ घातलेली निवडणूक ही संशयाच्या भोवऱ्यात सापडत चालली आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधी राजकिय पक्ष करीत आहेत आरोप
नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीचं या संपूर्ण निवडणूक प्रकियेवर आरोप होऊ लागले आहेत. याअगोदर प्रभाग आरक्षण सोडत ही फिक्स केली होती असा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी यांनी केला असून, त्यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.तर बुधवार २४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते आमदार गणेश नाईक यांनी देखील आरोप करत अधिकाऱ्यांनी एका मता मागे ५०० रु घेऊन प्रभागातील मतदार गायब केले असून, बोगस मतदार प्रभागात घालून याद्यांचा घोळ केल्याचा आरोप केला होता. याबाबत सगळ्या प्रशासकीय यंत्रणाना पत्र लिहिले असून यात सुधारणा न केल्यास आम्ही नवी मुंबई मनपा मुख्यालासमोर आंदोलन करू असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता.

५०० नव्हे तर १५०० रुपये अधिकाऱ्यांना देऊन केला भाजपने घोळ राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
मतदार याद्यात ५००रु नव्हे तर १५००रु अधिकाऱ्यांना देऊन हा घोळ भाजप ने केला आहे. आपले कृत्य जगासमोर येउ नये म्हणून स्वतःहुन अशी मागणी भाजत तर्फे केली जात आहे असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे या सर्व याद्या रद्द करुन पुन्हा एकदा नागरीकांच्या घरोघरी जाऊन नव्याने याद्या बनवाव्या आणि तो पर्यत ही निवडणूक स्थगित ठेवावी अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे. आमच्या कडे सक्षम पुरावे आहेत त्यात स्पष्ट होत आहेत की मतदार यादीत कशा प्रकारे बोगस नावांची नोंद केली गेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली न येता या याद्यात सुधारणा करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details