महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात मंदिरे उघडी करण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन.. - bjp agitation in thane

ठाण्यातील नौपाडा परिसरातील घंटाळी मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी सदर आंदोलन करण्यात आले.

ठाणे आंदोलन
thane andolan

By

Published : Oct 13, 2020, 6:00 PM IST

ठाणे- मंदिरे उघडी करण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी घंटानाद आंदोलन सुरु आहे. ठाण्यात देखील या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला आहे. या आधी कोपिनेश्वर मंदिरात आंदोलन केले. त्यानंतर भाजपने शहरातील मंदिरे सुरु करण्यात यावे अशी मागणी करत ठाण्यातील नौपाडा परिसरातील घंटाळी मंदिरासमोर आंदोलन केले. या वेळी सरकारचा देखील निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी सदर आंदोलन करण्यात आले.

ठाण्यात मंदिरे उघड़ी करण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन..

भाजपच्या वतीने मंदिर सुरु करण्यासाठी सूचना दिल्यानंतर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या पूर्वी देखील भाजपच्या वतीने ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details