महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाणे महापालिकेच्या ऑनलाइन महासभेविरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन - Online Mahasabha Thane Municipal News

ठाणे महापालिकेच्या महासभेचे आयोजन वेबिनारद्वारे केल्या जात आहे. ही महासभा ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्षात घ्यावी, या मागणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहाबाहेर भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन करत सभात्याग करून निषेध नोंदवला.

भाजपचे ठिय्या आंदोलन
भाजपचे ठिय्या आंदोलन

By

Published : Oct 20, 2020, 6:17 PM IST

ठाणे - महापालिकेची महासभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष घेण्यात यावी, अशी मागणी करत आज(मंगळवार) ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहाबाहेर भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात निदर्शनं केली. लोकसभा, राज्यसभा आणि विधीमंडळाचे अधिवेशनही प्रत्यक्ष पार पडले, मग महापालिकेचा महासभा वेबिनार का, असा सवालही यावेळी विचारण्यात आला. तसेच कोरोनाकाळात किती पैसे लागले याचा हिशोब महापौरांनी आणि पालिकेने द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज भाजपने सभात्याग करून निषेध नोंदवला.

ऑनलाइन महासभेच्या विरोधात भाजपचे ठिय्या आंदोलन

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या महासभेचे आयोजन वेबिनारद्वारे केल्या जात आहे. त्यात गेल्या दोन महासभांवेळी गोंधळ झाला. आजदेखील वेबिनारद्वारेच तिसरी महासभा पार पडली. गेल्या दोन वेबिनार महासभांमध्ये भाजपच्या सर्व नगरसेवकांना अनेक विषयांवर भूमिका मांडता आलेली नाही. कोविड-१९ च्या प्रादुर्भावावर करण्यात आलेल्या उपाययोजनांवर नगरसेवकांना बोलता आले नाही. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील विकासकामांकडेही महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधता आलेले नाही, यासाठी भाजप नगरसेवकांनी सदर आंदोलन करत सभात्याग करून निषेध नोंदवला.

हेही वाचा -नवरात्री विशेष : मुंब्रादेवी मंदिर आहे 'इतके' प्राचीन, एकाच ठिकाणावरून लाभते नऊ देवींच्या रुपाचे दर्शन !

ABOUT THE AUTHOR

...view details