ठाणे - पुराचे पाणी ओसरल्यानंतर ठिक-ठिकाणी विषारी बिनविषारी साप शिरल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच, रेल्वे ट्रॅकमध्ये एक भला मोठा साप अडकून पडल्याने तेथे काम करणाऱ्या कामगारांची पळापळ झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये घडली आहे.
अबब... रेल्वे ट्रॅक मध्ये अडकला नऊ फुटाचा साप; सापाला पाहून कामगारांची पळापळ - ऑर्डनन्स फॅक्ट्री अंबरनाथ
अंबरनाथमध्ये केंद्र सरकारच्या गृह विभागाची ऑर्डनन्स फॅक्ट्री आहे. सायंकाळच्या सुमारास फॅक्ट्रीमधील कामगार काम करत करतांना त्यांना रेल्वे ट्रॅकमध्ये एक भलामोठा साप अडकून पडलेला दिसला. सदर बाब फॅक्ट्रीमधील अग्निशामक दलाच्या कार्यालयात फोन करून कळविण्यात आली. त्यानंतर फायरमन प्रीतम गुरव व सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या भल्यामोठ्या सापाला सोडवले.
अंबरनाथमध्ये केंद्र सरकारच्या गृह विभागाची ऑर्डनन्स फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये एन.आर. एम सेक्शन असून इथून देशभरात गृह विभागाला विविध साहित्य पुरवले जातात. यासाठी रेल्वे ट्रॅकही बनवण्यात आला आहे. या फॅक्ट्री मधील एन.आर.एम सेक्शनच्या बाजूला असलेल्या रेल्वे ट्रॅकमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास फॅक्ट्रीमधील कामगार काम करीत होते. दरम्यान काम करतांना त्यांना रेल्वे ट्रॅकमध्ये एक भलामोठा साप अडकून पडलेला दिसला. त्यानंतर तन्मय वाघोरे या कामगाराने फॅक्ट्रीमधील अग्निशामक दलाच्या कार्यालयात फोन करून रेल्वे ट्रॅकमध्ये साप अडकल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच फायरमन प्रीतम गुरव व सर्प मित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या भल्यामोठ्या सापाला सोडवले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर या सापाची रेल्वे ट्रॅकमधून सुटका झाली. हा साप धामण जातीचा असून रेल्वे ट्रॅकमध्ये अडकल्याने जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे