ठाणे :कल्याण पूर्व आनंदवाडी जवळील जुन्या रेल्वे रुळात एका ठिकाणी अडकून ( Big snake stuck on railway tracks ) पडलेल्या भल्यामोठ्या सापाची सर्पमित्राने सुखरूप सुटका करून या सापाला वनविभाच्या ताब्यात दिले आहे. विशेष म्हणजे रेल्वे रुळात तब्बल ७ ते ८ तास अडकून पडलेला हा साप पूर्णतः सुरक्षित असल्याचे ( Snake Stuck On Railway Tracks ) सांगण्यात येत आहे.
Snake Stuck On Railway Tracks : रेल्वेच्या ट्रॅकमध्ये अडकला भलामोठा साप; सर्पमित्राकडून सुखरूप सुटका - Snake Stuck On Railway Tracks
कल्याण पूर्व आनंदवाडी जवळील जुन्या रेल्वे रुळात रेल्वेच्या ट्रॅकमध्ये भलामोठा साप अडकला ( Big snake stuck on railway tracks ) होता. सर्पमित्राला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापाला ( Snake Stuck On Railway Tracks ) सुखरूप बाहेर काढले.
![Snake Stuck On Railway Tracks : रेल्वेच्या ट्रॅकमध्ये अडकला भलामोठा साप; सर्पमित्राकडून सुखरूप सुटका Big snake stuck on railway tracks](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17177801-607-17177801-1670773492113.jpg)
रेल्वे रुळात अडकला साप - कल्याण पूर्वेतील आनंदवाडी नागरी वस्तीलाच लागून असलेली मध्य रेल्वेचे माल वाहतूक रुळांची वापरात नसलेली रेल्वे लाईन आहे. या पैकी एका रुळांच्या अडगळीत भागात भला मोठा साप अडकून पडल्याची माहीती वॉर फाऊंडेशनचे सर्पमित्र पियुष संतोष पालप यांना सायंकाळी ५ चे सुमारास काही जागृक नागरीकांनी मोबाईलवरून दिली. माहीती मिळताच घटनास्थळी त्वरीत धाव सर्प मित्र पियुष पालव याने सापाची सुटका केली.
७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका -हा साप अशा पद्धतीने अडकून पडला होता की, त्याला पुढेही जाता येत नव्हते, मागेही फिरता येत नव्हते. अशा परिस्थितीत अडकलेल्या सापाची सुमारे ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. या सापाला पुढील सोपस्कारासाठी वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले असून तो पुर्णपणे व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला नैसर्गिक आधिवासात सोडण्यात येईल असे सर्प मित्र पियुष पालव याने सांगितले.