ठाणे - गुजरात येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळ घडली आहे. गुजरात, जुनागढ येथील गिरनार पर्वतावर ही घटना घडली आहे.
भिवंडीतील भाविकाचा गुजरातच्या गिरनार पर्वतावर मृत्यू - girnar parvat
गुजरात येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळ घडली आहे.
अनंता बापू पाटील (५५ रा.सरवलीपाडा, भिवंडी ) असे हृदय विकाराच्या झटक्याने मृत झालेल्या भाविकाचे नाव आहे. अनंता हे सरवलीपाडा येथील ५० स्त्री आणि पुरुष ग्रामस्थांसह २७ डिसेंबर रोजी देवदर्शनाला गुजरातमध्ये गेले होते. रविवारी सकाळी गिरनार पर्वतावरील त्रिमुखी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन ते अन्य भाविकांसोबत पर्वताच्या पायऱ्या उतरत होते. त्यावेळी त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. त्यानतंर त्यांना घाम फुटला व भोवळ येऊन खाली कोसळले. त्यामुळे सोबतच्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ जुनागढ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या मृत्यूची नोंद स्थानिक जुनागढ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून त्यांचा मृतदेह पहाटे उशिरा त्यांच्या घरी पोहचणार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी अंत्यविधी करण्यात येणार आहेत. अशी माहिती त्यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व दोन विवाहित मुली, ३ भाऊ असा आप्तरिवार आहे.