महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकी, मोबाईल चोरीच्या वीस गुन्ह्यांचा छडा; दोन अल्पवयीन चोरट्यांसह एकूण सात जणांना अटक - ठाणे पोलीस बातमी

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात कडक निर्बंधावेळी काळात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी पोलिसांना तब्बल 20 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

चोर व मुद्देमाल
चोर व मुद्देमाल

By

Published : Jun 12, 2021, 9:06 PM IST

Updated : Jun 12, 2021, 10:43 PM IST

ठाणे -भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात कडक निर्बंधावेळी काळात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी पोलिसांना तब्बल 20 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शांतीनगर, भोईवाडा व भिवंडी शहर या तीन पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध भिवंडी शहरातील भागातून 7 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 5 लाख 45 हजार रुपये किमतीच्या तब्बल 11 दुचाकी, एक रिक्षा, सात मोबाईल व एक इलेक्ट्रिक मोटार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या सात आरोपींमध्ये दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सुद्धा समावेश आहे.

आरोपीसह पोलीस

अल्पवयीन चोरट्यासह साथीदाराकडून सहा दुचाकी जप्त

शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या एक अल्पवयीन मुलासह एकास ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या जवळून 2 लाख 31 हजार किमतीच्या 6 दुचाकी, 1 मोबाईल, 1 इलेक्ट्रिक मोटार जप्त केली तर भोईवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा भिवंडी यांच्या संयुक्त कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याच्या जवळून 90 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.

3 चोरट्याकडून 3 दुचाकी, 1 रिक्षा व 6 मोबाईल जप्त

भिवंडी शहर पोलिसांनी अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दरवा, मोहम्मद याकूब इसाक अली शाह उर्फ याकूब मामा व संजय शाम सोळंकी या तीन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून तीन दुचाकी, एक रिक्षा व 6 मोबाईल, असा 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सर्व कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीच्या घटनांना अटकाव घालण्यात यश मिळणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा -अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीवर 551 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

Last Updated : Jun 12, 2021, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details