ठाणे -उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली हद्दीतील एका २६ वर्षीय विधवा पीडितेवर बळजबरीने बलात्कार करून आरोपी फरार झाला. तेव्हापासून युपीचे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच रायबरेलीतील सलोन पोलिसांनी भिवंडी पोलिसांना आरोपीचा केवळ मोबाईल नंबर दिला. याच आधारावर शांतीनगर पोलिसांनी गैबीनगर परिसरातील एका लूम कारखान्याजवळ सापळा रचून त्याला अटक केली आहे. सलमान मो. शाह (वय २६ वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे.
- ठार मारण्याची धमकी देऊन पीडितेवर बलात्कार -
२६ वर्षीय पीडित विधवा उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली जिल्ह्यातील सलोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपीही याच परिसरात राहत असल्याने त्याची ओळख होती. त्यातच लॉकडाऊनपूर्वी पीडितेच्या पतीचे निधन झाल्याने याचा फायदा घेत आरोपी सलमानने तिच्याशी जवळकी साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांमध्ये वर्षभर प्रेमसंबंध सुरु असतानाच गेल्यावर्षी तिला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार करून पसार झाला. त्यावेळी याप्रकरणी सलोन पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला.
हेही वाचा -पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सात दिवस आत्याचार, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक
- युपी पोलीस दोन वर्षांपासून आरोपीच्या शोधात -