ठाणे- भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातील प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहारप्रकरणी, पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या शेट्टी यांची आज अखेर सोमवारी दुपारी तडकफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. ही कारवाई पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी केली आहे. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
भिवंडी पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी उचलबांगडी - आयुक्त
आरोग्य विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विद्या शेट्टी यांनी शासनाकडून येणाऱ्या औषधांचा पुरवठा व प्रशासकीय कामात अनियमितता ठेवून आर्थिक अपहार केला. अशी तक्रार महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे व पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली होती.
प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. जयवंत धुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. शेट्टी त्यांच्या पदाचा पदभार डॉ. धुळे यांच्याकडे सुपूर्द करावा, असे आदेश देण्यात आले आहे. भिवंडी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या डॉ. विद्या शेट्टी यांनी शासनाकडून येणाऱ्या औषधांचा पुरवठा व प्रशासकीय कामात अनियमितता ठेवून आर्थिक अपहार केला. अशी तक्रार महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे व पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्याकडे केली होती.
त्यामुळे आयुक्त मनोहर हिरे यांनी तातडीने चौकशी समिती नेमून त्यास अधीन राहून अखेर आज डॉ. विद्या शेट्टी यांची पदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी डॉ. जयवंत धुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत उपायुक्त दीपक कुरळेकर यांनी डॉ. धुळे यांना तातडीने पदभार स्वीकारण्यासाठी लेखी पत्र दिले आहे.