ठाणे- भिवंडी निजामपूर शहर महापालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी स्थायी समितीकडे केला सादर केले. 880 कोटी 33 लाख 99 हजार रकमेचे हे अंदाजपत्रक आहे. मात्र, करवाढ करण्यात आलेली नाही. वर्षाअखेर हे अंदाजपत्रक सुमारे 16 लाख 66 हजार रुपये शिल्लकीचे आहे.
मनपाच्या स्व. यशवंत चौधरी सभागृहात झालेल्या विशेष अर्थसंकल्प सभेत आयुक्त आष्टीकर यांनी स्थायी समिती सभापती हालीम अन्सारी यांचेकडे हा प्रशासकीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी स्थायी समिती सदस्य विलास पाटील, संतोष शेट्टी, इम्रान खान, वसीम अन्सारी, मदन नाईक, सिराज ताहीर इत्यादी उपस्थित होते. या अर्थसंकल्पात एकूण 9 भाग करण्यात आले असून 'अ' भागात महसुली व भांडवली तर 'क' भागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, तर 'पी' म्हणजे पूअर अर्थसंकल्प, अग्निशमन व आपत्ती, व्यवस्थापन शिक्षण विभाग अर्थसंकल्प, परिवहन अर्थसंकल्प अशा 9 विभागात तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा -भिवंडीत बोकडाच्या हाडावरून राडा; चौघांवर गुन्हा दाखल
मनपा आयुक्तांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात कोणत्याही प्राकारची कर वाढ करण्यात आलेली नाही. तसेच स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह दुरुस्ती, बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन, अग्निशमन विभाग बळकटीकरण, सुसज्ज अग्निशमन विभाग, साईट नंबर 54 येथे मार्केट बांधणे, वराळदेवी तलाव विकास व संवर्धन, शहरासाठी पर्जन्य जलवाहिन्या बांधणे, भुयारी गटार योजनेस घरगुती मलवाहिन्या जोडणे, मनपा आरक्षणाखालील रस्ते विकसित करणे, मनपाच्या ताब्यातील आरक्षणाखालील असलेल्या जागा संरक्षित करणे, शहरातील कत्तलखाना कार्यान्वित करणे, शहरातील रस्ते विकासाची विविध माध्यमे वापरून रस्ते विकसित करणे, शाळा इमारत दुरुस्ती, शौचालय दुरुस्ती, मनपा कर्मचारी वसाहत दुरुती, उद्यान सुशोभीकरण इत्यादी प्रमुख करण्यात येणार आहेत.
शासन निर्णयाप्रमाणे नगरसेवक निधी, महिला व बालकल्याण, दुर्बल घटक, अंध व दिव्यांग कल्याण या लेखा शीर्षकाकरिता बांधील खर्च वजा करता उर्वरित उत्पनाच्या 5 टक्के प्रमाणे तरतूद या प्रशासकीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सन 2019-2020 चे सुधारित अंदाजपत्रक 667 कोटी 67 लाख 92 हजार रुपयांचे होते. तर 2020 -2021 मधील अर्थसंकल्प हा 880 कोटी 33 लाख 90 हजार रुपयांचा मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी मंगळवारी मनपा आयुक्तांनी सादर केले. दरम्यान, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा चांगल्या प्रकारे पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पामुळे शहरातील नागरिकांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत, असा आशावाद यावेळी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -धक्कादायक! बियरची बाटली फोडून स्वतःच्याच गळ्यात भोसकून घेत तरुणाची आत्महत्या