महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत एमआयएम अध्यक्षावर सहा दिवसात खंडणीचा चौथा गुन्हा दाखल - एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख खंडणी बातमी

ठाणे गुन्हे शाखेने २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री समदनगर येथील एमआयएमचे शहरध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांच्या बंगल्यावर तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले त्यानंतर खालिद गुड्डू शेख त्याचा भाऊ इफ्तेखार मुख्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया, गुलाम खान, फैज आलम यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्या.

bhiwandi mim president files fourth ransom case in six days at thane
भिवंडीत एमआयएम अध्यक्षावर सहा दिवसात खंडणीचा चौथा गुन्हा दाखल

By

Published : Oct 1, 2020, 5:31 PM IST

ठाणे - एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख याला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली. मागील सहा दिवसात खालिद गुड्डू व त्याच्या विविध साथीदारांविरोधात तीन पोलीस ठाण्यात खंडणीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका पत्रकाराचा समावेश असून खंडणीबहाद्दर खालिद गुड्डू हा आपल्या हस्तकामार्फत अनधिकृत बांधकामांची तक्रार करायचा. त्यांनतर तक्रारींवर काय कारवाई भिवंडी पालिकेने केली याची माहिती माहितीच्या अधिकार अर्ज करून मागवायचा. बांधकाम व्यवसायाकांकडून खंडणीची मागणी करायाचा. जो खंडणी देत नाही त्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करून तसेच धमक्या देऊन खंडणी उकळत होता.

बिल्डर मोहम्मद तारिक इकबाल अहमद शेख यांनी कासीम नगर चव्हाण कॉलनी येथे एक जुन्या घराच्या ठिकाणी ते पाडून महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही रितसर परवानगी न घेता अनधिकृत इमारत उभारण्याचे काम सुरू केले. खालिद गुड्डू याचे साथीदार अकबर गफूर खान, जैद अकबर खान यांनी डिसेंबर 2017 पासून वेळोवेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन बांधकाम बंद पाडून धमकावणे शिवीगाळ करत. त्यानंतर खालिद गुड्डू यांच्या करवी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बांधकाम तोडण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी केली. वेळोवेळी तक्रारदारांकडून 4 लाख रुपये बळजबरीने घेतले. तक्रारदारांने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात भांदवी कलम 386, 387,34 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी अकबर गफूर खान ,जैद अकबर खान यांना अटक केली आहे.

भिवंडी शहरात इमारत बांधकाम व्यासायिकाकडून एक लाख रुपयांची खंडणी घेताना एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांसह त्याच्या तीन साथीदारांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करण्यास सुरुवात केली. शांतीनगर येथील बांधकाम व्यासायिकाकडून १२ लाख रुपयांची खंडणी स्वीकारल्या बद्दल शांतीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करत या गुन्ह्यात खालिद गुड्डू यांचे अन्य तीन साथीदार हमीद शेख, रियाझ शेख व त्याचा आणखी साथीदार अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. तर खालिद गुड्डू यास यागोदरच अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीच तकविम उर्फ भुट्टू एजाज खान या बांधकाम व्यावसायिकास धमकावून खंडणी उकळण्यासाठी वेळोवेळी त्रास दिल्याने त्याने ठाणे गुन्हे शाखा यांच्याकडे या विरोधात तक्रार दिली. ठाणे गुन्हे शाखेने २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री समदनगर येथील एमआयएमचे शहरध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांच्या बंगल्यावर तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडले त्यानंतर खालिद गुड्डू शेख त्याचा भाऊ इफ्तेखार मुख्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया, गुलाम खान, फैज आलम यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आल्या. नंतर पोलिसांनी शहरातील अनधिकृत इमारत बांधकाम करणारे बिल्डर्स यांच्या विरोधात तक्रार करून तसेच अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून धमकावून पैसे उकळण्यात येत असल्याचे समोर आले. या सारखे अजून कोणी कोणास धमकावून पैसे उकळण्या सारखे प्रकार केले असतील तर त्या बाबत गुन्हे शाखा भिवंडी अथवा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

त्या नुसार शांतीनगर येथील बिल्डर्स मोहम्मद आलम अकिम अन्सारी यांच्या भागीदारीतील बांधकामाबाबत तक्रार करून त्या विरोधात खालिद गुड्डू यांच्या एका साथीदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दोघांनी संगनमताने बिल्डर्स यास धमकावून त्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी २९ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १२ लाख रुपये २०१७ मधील रमजान महिन्या पासून २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत स्वीकारले होते. त्या नंतर याच बांधकामाविरोधात रियाज शेख याने पुन्हा याचिका उच्च न्यायालयात दाखल करून तक्रारदारास धमकविण्यास सुरवात केल्याने मुख्य सूत्रधार खालिद गुड्डू यास अटक झाली. नंतर त्या विरोधात तक्रारदार तक्रार देण्यासाठी पुढे येत
बिल्डर्स मोहम्मद आलम अकिम अन्सारी याने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरुन पोलिसांनी हमीद शेख, रियाझ शेख ,व त्यांचा एक साथीदार या तिघांना ताब्यात घेत त्या विरोधात भांदवी कलम ३८६ ,३८७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली.

भिवंडी शहरातील अनधिकृत इमारतींविरोधात तक्रार करून खंडणी उकळण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने पोलिसांनी या गोष्टीचे गांभीर्य बाळगत सुरू केलेल्या कारवाई सत्राने अशा गुन्ह्यातील आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details