भिवंडीत प्लास्टिक गोदामांवर पालिका प्रशासनाची धाड; ६ टन प्लास्टिक जप्त - lakh
सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील शफी कंपाऊंडमधील २ गोदामांमध्ये प्लास्टिक पिशवी, ग्लास तसेच अन्य प्लास्टिक वस्तू साठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांना मिळाली
ठाणे - भिवंडी शहरातील शफी कंपाऊंडमधील 2 गोदामांमध्ये प्लास्टिक पिशवी, ग्लास तसेच अन्य प्लास्टिक वस्तू साठवण्यात आल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या सहाय्यकला मिळाली होती. त्यांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशाने दुपारी येथे छापेमारी करीत ६ लाख किंमतीचे ६ टन प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या.
प्रदुषणामध्ये बेसुमार वाढ झाल्याने महाराष्ट्रमध्ये प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण, तसेच थर्माकोल इत्यादींच्या वापरावर राज्य सरकारने १५ मार्च २०१८ ला पूर्णपणे बंदी घातली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे, असे असताना भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील शफी कंपाऊंडमधील २ गोदामांमध्ये प्लास्टिक पिशवी, ग्लास तसेच अन्य प्लास्टिक वस्तू साठवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त दिलीप खाने यांना मिळाली, त्यांनी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांच्या आदेशाने दुपारी छापा टाकून ६ लाख रुपये किंमतीचे ६ टन प्लास्टिकच्या वस्तू जप्त केल्या. जप्त केलेले प्लास्टिक पालिकेच्या भांडार गृहात जमा करण्यात आले आहे.
कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेले हे प्लास्टिक अवैध इमारतीच्या गाळ्यांमध्ये साठवण्यात आल्याचे उघड झाल्याने प्रभाग समिती क्र. २ चे सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांनी अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने ईमारतीवर निष्कासनाची कारवाई केली.