महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhiwandi Fire : भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे लोट - केमिकल गोदामाला भीषण आग

Bhiwandi Fire : भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड (Govind Compound) येथे केमिकल गोदामाला भीषण आग (Fire News) लागली. केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामासह चप्पलचे गोदाम असे तिन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

Bhiwandi Fire
केमिकल गोदामाला भीषण आग

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 5:21 PM IST

केमिकल गोदामाला भीषण आग

ठाणेBhiwandi Fire : भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसाआड लहान मोठ्या आगीच्या दुर्घटना घडतच (Fire News) आहेत. त्यातच आज दुपारच्या सुमारास राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोवींद कंपाऊंड (Govind Compound) मधील एका गोदामात ठेवण्यात आलेल्या केमिकलला अचानक आग लागली. या आगीमुळे लगतच्या केमिकल गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकलने क्षणातच मोठा पेट घेऊन दोन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. तर केमिकल गोदामालगत असलेल्या एका चप्पलचे गोदामही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. सद्या भिवंडी अग्निशामक दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट: याआधीही 12 मे रोजी अशीच एक घटना घडली होती. तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील देशमुख कंपाउंड येथे ही घटना घडली होती. या गोदामात घातक रासायनिक साठा साठवला होता. आगीची घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या होत्या. तर या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.

केमिकलमुळे रौद्ररूप : ही आग एवढी भीषण होती की, या आगीचे लोट परिसरात पसरून नागरिकांचे डोळे चुरचुरत होते. तर काहींना घश्याना त्रास झाला होता. या आगीची घटना भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात मिळताच घटनस्थळी अग्निशमनचे जवान दाखल झाले होते. मात्र केमिकलच्या गोदामात असलेल्या काही ज्वालाग्राही घातक केमिकलमुळे अग्नी रौद्ररूप धारण केलं होतं. या आगीत लाखो रुपयांचे केमिकलचे ड्रम जळून खाक झाले होते.



हेही वाचा -

  1. Bhiwandi Fire : भिवंडीतील डाईंग फॅक्टरीला भीषण आग; पहा व्हिडिओ
  2. Fire in Pub : बंगळुरूतील पबमध्ये भीषण आग; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यानं चौथ्या मजल्यावरून उडी मारली
  3. Bengaluru Godown Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details