महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhiwandi Crime News : क्रुरतेचा कळस! सहा वर्षीय चिमुकलीची हत्या; हत्येनंतर मृतदेह कोंबला प्लास्टिकच्या बादलीत

Bhiwandi Crime News : ठाण्यातील भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. अज्ञाताने सहा वर्षीय चिमुकलीची हत्या करत, मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून ठेवून आरोपी फरार झाला.

सहा वर्षीय चिमुकलीची हत्या
Bhiwandi Crime News

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 9:28 PM IST

नवनाथ ढवळे, पोलिस उपायुक्त, भिवंडी

ठाणे Bhiwandi Crime News : ठाण्यातील भिवंडी शहरात एका सहा वर्षीय चिमुरडीची हत्येची घटना भिवंडीतील फेणेगाव परिसरातील धापसी पाडा येथील एका पत्र्याच्या चाळीत घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केलाय.



चिमुकली घरातून गायब :पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या चिमुकलीचे आई-वडील हे दोघंही भिवंडीतील एका गोदामात काम करण्यासाठी जातात. 13 सप्टेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे रोजी कामासाठी निघून गेले होते. तेव्हा सहा वर्षीय चिमुकली सोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरीच होता. मात्र ही चिमुकली सकाळपासूनच बेपत्ता झाली होती. सायंकाळी आई-वडीलांना घरी आल्यावर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन शोध घेण्यास सुरवात केली. यानंतर पोलीसांनी नजीकच्या वऱ्हाळा तलावात सर्च ऑपरेशनही घेतले होते. परंतु, त्यात चिमुकली आढळून आली नव्हती.

दुर्गंधी आल्यानं घटनेचा उलघडा : दरम्यान स्थानिकांनी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यावर एका बंद असलेल्या चाळीतील खोलीत प्लास्टिकच्या बकेटमध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या घटनेचा तत्काळ पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठवला. घटनस्थळावर ठाणे येथील ठसे तज्ज्ञ पथकालाही बोलावण्यात आलं होत. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरुन हत्येचा गुन्हा दाखल केलाय. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढवली जाईल, असं सांगत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Minor Burn Cigarette : आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून चार वर्षाच्या चिमुकल्याला सिगारेटचे चटके, नराधमाकडून मुलांचा छळ
  2. Thane Lift Accident : ठाण्यातील लिफ्ट अपघातात बिहारमधील ४ मजुरांचा मृत्यू, कुटुंबियांचा ठाणे प्रशासनावर गंभीर आरोप, म्हणाले..
  3. Brother Rape Sister : रक्षा बंधनलाच नात्याला काळिमा : 18 वर्षीय भावाचा अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details