ठाणे - अकरावी वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव दुसऱ्या मित्राला सांगितल्याच्या वादातून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. या राडेबाजी वेळी हॉटेलवर चर्चा करण्यासाठी बोलावून एका मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात ( Bhoiwada Police Station ) चार राडेबाज मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
वाद मिटविण्यासाठी बोलवून पुन्हा घातला वाद -पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार कोकण मुस्लीम एज्युकेशन सोसायटीकॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलगा व संशयित असलेले मुले हे वर्गमित्र आहेत. 31, जानेवारीला दुपारच्या सुमारास महाविद्यालयात एका वर्गमित्राने दुसऱ्या वर्गमित्राला संशियताच्या गर्लफ्रेंडचे सांगितले. त्यामुळे ज्याने नाव सांगितले व ज्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले या दोघांचे भांडण झाले होते. भांडण मिटविण्यसाठी राडेबाजांनी त्या मुलाला भिवंडीतील कारीवली रोडवरील आजमी हॉटेलजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बोलावले होते.