महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुगंधित अत्तर विक्रीच्या आडून अमली पदार्थाचा गोरखधंदा; तस्कराला बेड्या - रुक्मिणी ढाबा

सुगंधित अत्तर विक्रीच्या आडून अमली पदार्थाची विक्रीचा गोरखधंदा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी गावच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्या शेजारी घडला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुद्देमालासह तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद हुसेन जुम्मा मेमन ( वय 41 वर्षे, रा. अमृत नगर, कौसा, मुंब्रा ), असे अटक तस्कराचे नाव आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : May 1, 2022, 9:31 PM IST

ठाणे - सुगंधित अत्तर विक्रीच्या आडून अमली पदार्थाची विक्रीचा गोरखधंदा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी गावच्या हद्दीत असलेल्या एका ढाब्या शेजारी घडला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून मुद्देमालासह तस्कराला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद हुसेन जुम्मा मेमन ( वय 41 वर्षे, रा. अमृत नगर, कौसा, मुंब्रा ), असे अटक तस्कराचे नाव आहे.

तस्करावर झडप घेऊन पोलिसांनी घेतले ताब्यात -तस्कर मोहम्मद हुसेन जुम्मा मेमन हा मुंबई - नाशिक महामार्गावरील ओवळी गावाजवळील रुक्मिणी ढाब्याजवळ अत्तर विक्रीच्या नावाने एमडी पावडर हा अमली पदार्थ विक्री करत आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. 21 एप्रिल) पोलिसांनी महामार्गावर अमली पदार्थ विक्रिसाठी आलेल्या ठिकाणी सापळा रचला होता. या दरम्यान पोलिसांनी तस्कर मोहम्मदवर झडप घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर झाडझडती घेतली असता त्याच्याकडून 10 ग्रॅम एमडी पावडरसह 70 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू -या प्रकरणी भिवंडी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंग थानसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुरुवारी नारपोली पोलिसांनी तस्कराविरुद्ध एनडीपीएस कायदा 8 (अ), 22 (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अटक तस्कराकडून जप्त केलेले एमडी पावडर कुठून आणले. तसेच तो किती दिवसापासून सुंगधित अत्तर विक्रीच्या नावाने अमली पदार्थ विक्रीचा गोरखधंदा करत होता. याचा अधिक तपास भिवंडी गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अधिकारी करत आहेत.

हेही वाचा -Dipali Sayyed Criticized Amruta Fadnavis : 'फडणवीसांनी दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये अन्यथा...'

ABOUT THE AUTHOR

...view details