महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत कपड्यांच्या गोदामांना भीषण आग; चार गोदामे जळून खाक - cloths go dawn burn in fire news

भिवंडी तालुक्यातील सुप्रीम ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कपड्यांच्या गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. तर, या आगीत आत्तापर्यंत ४ गोदाम जळून खाक झाले आहेत.

भीषण आग

By

Published : Sep 15, 2019, 9:13 AM IST

Updated : Sep 15, 2019, 9:30 AM IST

ठाणे -भिवंडी तालुक्यात ओवळी ग्रामपंचायत हद्दीमधील पारसनाथ कंपाऊंड येथील सुप्रीम ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कपड्यांच्या गोदामांना भीषण आग लागली आहे. या आगीत ४ गोदामे जळून खाक झाली आहेत. तर, अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

भिवंडीत कपड्यांच्या गोदामांना लागलेली भीषण आग


ज्वालामुखीचे शहर ओळखले जाणाऱ्या भिवंडीत पुन्हा एकदा पारसनाथ कंपाऊंडमध्ये असलेल्या सुप्रीम ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतरच केला जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


दरम्यान, ही आग भीषण स्वरूपाची असल्याने या आगीत आत्तापर्यंत ४ गोदामात साठवून ठेवलेला लाखो मिटर कपडा जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथील अग्निशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या आहेत. तर, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशामक दलांच्या जवानाकडून सुरू आहेत.

Last Updated : Sep 15, 2019, 9:30 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details