ठाणे : ठाणे जिल्ह्यातील गोवर रुग्णांचा ( Measles Patients ) हॉटस्पॉट ठरलेल्या भिवंडी शहरात पुन्हा एकदा गोवरबाधित रुग्णांचा प्रकोप वाढल्याचे महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. तब्बल ७९३ संशयीत रुग्ण ( Measles patients in Bhiwandi ) हे गोवर बाधित आढळून आल्याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाकडून जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे.
आतापर्यंत तीन बालकांचा मृत्यू - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामधील गोवर बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तब्बल ९२६ गोवर बाधितांचे नमुने तपासले असता त्यामध्ये ७९३ रुग्णांचे नमुने संशयित आढळून आले आहे. लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४८ वर गेली आहे. तर आता पर्यंत शहरात एकूण तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करीता हाफकीन रिसर्च इन्स्टीटयूट, परेल, मुंबई येथे पाठविण्यात आले होते. या अहवालात ४८ रुग्ण हे गोवर रुबेला बाधीत असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर या अहवाला अंतर्गत फक्त १४ रुग्णांचे गोवर रुबेला लसीकरण झालेले आहे. व इतर रुग्णांचे गोवर रुचेला लसीकरण झालेले नाही ही धक्कादायक बाब समोर आली आहे.