ठाणे : आज सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास स्थानिक पोलीस आणि तहसील प्रशासनाकडून परिसरातील किंवा दुर्घटना ग्रस्त इमारतीमधील कोणी रहिवाशी बेपत्ता आहे का? असे जाहीर करून घटनास्थळचे मदतकार्य थांबविल्याचे जाहीर केले. ४५ तास अहोरात्र मदतकार्य पाहता, टीडीआरएफ आणि एनडीआरएफसह अग्निशमन दलाच्या जवानांचा स्थानिक गावकऱ्यांनी छोटेखानी सत्कार करून त्यांचे आभार मानले. दरम्यान, घटनास्थळी टीडीआरएफ, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक आज सकाळपर्यत मदत कार्य करीत इमारतीचा संपूर्ण ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे : नवनाथ सावंत (वय - ४०) लक्ष्मीदेवी रवी म्हातो (वय - २६ ) श्रीमती .सोना मुकेश कोरी (वय - ४५ ) सुधाकर गवई ( वय - ३४) प्रवीण प्रमोद चौधरी (वय - २२) त्रिवेणी यादव (वय - ४०), दिनेश तिवारी (वय - ३७) अशोक मिश्रा (वय - २९) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर जखमिंची नावे , सोनाली परमेश्वर कांबळे (वय - २२) , शिवकुमार परमेश्वर कांबळे (वय - अडीच वर्षे), मुख्तार रोशन मंसुरी (वय - २६), चींकु रवी महतो (वय - ३ वर्ष), प्रिन्स रवी महतो (वय - ५ वर्ष), विकासकुमार मुकेश रावल (वय - १८ वर्ष), उदयभान मुनीराम यादव (वय - २९), अनिता (वय - ३०), उज्वला कांबळे (वय - ३०, सुनिल पिसाळ (वय - ४२)