ठाणे - आता काय जगतोय.. असेच म्हणण्यासारखी ती भयाणक, काळीकुट्ट परिस्थिती... मात्र कोणीतरी आपल्याला यातून बाहेर काढेल, या आशेवर तब्बल दहा तास मृत्यूशी अक्षरश: झुंझ दिली. बचाव पथकाच्या जवानांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत खालिद खान नावाच्या व्यक्तीला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढले. भिवंडीतील इमारत दुर्घटनेतील हा थरार आहे.
ढिगाऱ्याखाली सुमारे १० तास अडकून पडलेल्या या व्यक्तीकडे केवळ एक लिटर पाण्याची बाटली आणि मोबाईल होता. त्याला काही वेळ आपण आता वाचू शकत नाही, असेही वाटत होते. यामुळे त्याने ढिगाऱ्याखालीच मोबाईलवर दुर्घटनेत घडलेला थरार व मुलांनो आईला त्रास देऊन नका, असा व्हिडिओ तयार केला. यावेळात त्याने अनेकांशी मोबाइलवरून संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला. पण, नेटवर्क मिळत नव्हते. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून बचाव पथकाने त्याचा आवाज ऐकून १० तासानंतर ढिगाऱ्यातून बाहेर काढले. उघड्या डोळ्याने मी मृत्यू पाहिला, पण खुदाने माझ्यासाठी बंदे पाठवून मला वाचवले, असे खालिद म्हणाला. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खालिद कुटुंबासह राहत आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : भिवंडी अग्निशमन दलाच्या जांबाजांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान