ठाणे - भिवंडी धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाऊंडमधील जिलानी नामक ३ मजली इमारत असून या इमारतीचा अर्धा भाग आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. या इमारतीत एकूण ५४ सदनिका होत्या, यापैकी 21 सदनिका पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आणि यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहे.
घटनास्थळी जाण्यासाठी चिंचोळ्या गल्ल्या असून हा परिसर खूपच दाटीवाटीचा आहे. त्यामुळे बचावकार्यसाठी यंत्र साम्रगी घेऊन जाण्यात बचाव कार्याच्या पथकाला अडचणीचे ठरत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली, यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढली. या कारणाने जवळच असलेल्या मस्जिदमधून लोकांना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय मस्जिदमध्ये पीडित लोकांसाठी पाणी आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज देवकर यांनी...
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्यांची नावे -
१) मोबिन शेख ( वय ४५ )
२)हैदर सलमानी ( वय २० )
३) रुकसार कुरेशी ( वय २६ )
४) मोहम्मद अली ( वय ६० )
५) शब्बीर कुरेशी (वय ३० )
६) मोमीन शेख ( वय ४५ )
७) कैसर सिराज शेख ( वय २७ )
८) रुकसार जुबेर शेख ( वय २५ )
९) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी ( वय १८ )
१०) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (वय २२ )