महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र भीम आर्मी प्रमुख अशोक कांबळे नजरकैदेत; साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावरील पोस्ट 'भोवली'? - फेसबुक

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र भीम आर्मी प्रमुख अशोक कांबळे यांनी फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओमध्ये अशोक कांबळे यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

भीम आर्मी

By

Published : Apr 26, 2019, 11:16 PM IST

ठाणे- महाराष्ट्र भीम आर्मी प्रमुख अशोक कांबळे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओमध्ये अशोक कांबळे यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या तोंडाला जो कोणी काळे फासेल, त्याला महाराष्ट्र भीम आर्मीकडून पाच लाख रुपयांचे बक्षीस आणि पुरस्कार देण्यात येईल, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

भीम आर्मी


आज सकाळी 9 वाजता अशोक कांबळे यांना घाटकोपर पोलिसांनी घरून ताब्यात घेत ठाण्यात आणून नजरकैदेत ठेवल्याची माहिती भीम आर्मी पदाधिकारी राजू झनके यांनी दिली आहे. भीम आर्मी एक सामाजिक संघटन आहे. या सामाजिक संघटनेसोबत देशातील बहुजन समाजातील आणि इतर समाजातील तरुण देशभर जोडलेले आहेत. सामाजिक विषमतेवर काम करणारी संघटना म्हणून भीम आर्मीची ओळख आहे. भीम आर्मीचे राष्ट्रीय प्रमुख उत्तरप्रदेश येथील चंद्रशेखर आझाद आहेत.


महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद हेमंत करकरे यांच्यावर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गंभीर व्यक्तव्य केले होते. त्यावर कांबळे यांनी सोशल माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमध्ये गावात मत मागण्यासाठी आल्यास बंदी घाला आणि तोंडाला काळे लावा. जो कोणी त्यांच्या तोंडाला काळे लावेल त्यास महाराष्ट्र भीम आर्मीतर्फे पाच लाख रुपये आणि पुरस्कार देण्यात येईल, असे म्हटले होते.


यावेळी चेंबूर तालुका भीम आर्मी अध्यक्ष अविनाश सीमांतकर म्हणाले, अशोक कांबळेंना सकाळी 9 वाजता घरातून पोलीस गाडीत बसवून घाटकोपर पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. सायंकाळपर्यंत आम्हाला कांबळेचे काय झाले, कशाबाबत नजरकैदेत ठेवले ते समजले नाही. ही सरकारची दडपशाही आहे.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा असल्याने आमच्या प्रमुखास नजरकैदेत ठेवले आहे. आमची सामाजिक संघटन आहे. पक्षाचा यात काहीही सबंध नाही. ही सरकारची दडपशाही आहे, दुसरे काही नाही. मात्र या प्रकरणावर पोलीस अधिकारी प्रसारमध्यमांसमोर बोलत नसल्याची माहिती भीम आर्मीचे पदाधिकारी राजू झनके यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details