नवी मुंबई -शहरात असणारी कमी जागा यामुळे भूमिगत गटारांची निकड वाढत आहे. नवी मुंबई शहरात दिवसागणिक नागरिकांची गर्दी वाढत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई शहर असल्याने येथे राहण्यास नागरिक प्रथम पसंती देत असतात. सिडकोने वसवलेले शहर म्हणून नवी मुंबई शहर हे सुनियोजित शहर आहे. त्यामुळे येथे भूमिगत गटारे मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, कित्येक गटारांची झाकणे गायब झाली आहेत. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -Mucormycosis : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचा कहर, राज्यभर सापडत आहेत रुग्ण
स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशात तिसऱ्या क्रमांकाचे मानांकन -
स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळे येथे भूमिगत गटारांची विशेष काळजी घेतली जात आहे. वेळोवेळी गटारे साफ करण्यात येत असल्याने येथे गटारे तुंबणे, दुर्गंधी होणे या सारख्या समस्या पाहायला कमी मिळत आहेत. सद्यस्थितीत शहरात भूमिगत गटारांची सफाई ही यांत्रिक पद्धतीने करण्यात येत आहे. गटारात उतरून विषारी वायू पसरल्याने सफाई करणाऱ्या लोकांचे मृत्यू होणे, बेशुद्ध पडणे या सारख्या समस्यांमुळे यंत्रांच्या सहाय्याने भूमीगत गटारांची सफाई करत असल्याची माहिती नवी मुंबईचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या अनुषंगाने भूमिगत गटारांच्या सफाईकडे विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.