महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२०० वर्ष जुन्या तोफांचे होणार विसर्जन घाटावर सुशोभीकरण - भूईकोट किल्ला

पुरातत्व विभाग, ठाणे महानगर पालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे.  महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीचे कार्यकर्ते १३ तोफांपैकी ६ तोफा विसर्जन घाटावर महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर सुशोभित करणार आहेत.

tofa
२०० वर्ष जुन्या तोफांचे होणार विसर्जन घाटावर सुशोभिकरण

By

Published : Feb 8, 2020, 7:34 PM IST

Updated : Feb 8, 2020, 8:05 PM IST

ठाणे - शहरातील भूईकोट किल्लाच्या (आत्ताचे सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी तैनात पोर्तुगीज बनावटीच्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संवर्धन करण्यात येणार आहे. खाडी किनारी मातीमध्ये उलट्या गाडण्यात आलेल्या या २०० वर्ष जुन्या तोफा आता जमिनीवर मांडण्यात येणार असल्याने मोकळा श्वास घेणार आहेत.

२०० वर्ष जुन्या तोफांचे होणार विसर्जन घाटावर सुशोभीकरण

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीची मृत्यूशी झूंज अद्याप सुरूच

पर्यटकांना पाहण्यासाठी त्या दर्शनी भागात ठेवण्यात येणार आहेत. पुरातत्व विभाग, ठाणे महानगर पालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गडसंवर्धन समितीचे कार्यकर्ते १३ तोफांपैकी ६ तोफा विसर्जन घाटावर महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर सुशोभित करणार आहेत.

हेही वाचा - VIDEO : भररस्त्यात महिलेला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक प्राचीन गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह हा सुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. पूर्वीचा भूईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वास्तूच्या संरक्षणासाठी सुमारे ४० तोफा तैनात ठेवण्यात आल्या होत्या, असे जाणकार सांगतात. १६ व्या शतकात पोर्तुगीज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करीत. तेव्हा व्यापारी जहाजे बांधण्यासाठी काही तोफांचा वापर केला जात असे. त्यातील सध्यस्थितीत ११ तोफा शिल्लक आहेत. याच तोफा मातीमध्ये उलट्या गाडलेल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात आणि पुरातत्व खाते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुर्लक्षामुळे या तोफांची माती होऊ लागली आहे. गड संवर्धन समितीने पुढाकार घेऊन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे, राजे प्रतिष्ठान चिपळूण आणि चेंदानी कोळीवाडा जमात ट्रस्ट या तोफांची निगा राखणार आहेत.

Last Updated : Feb 8, 2020, 8:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details