ठाणे: हर हर महादेव सिनेमाचा शोबंद ( Showband of Har Har Mahadev movie ) पाडल्यानंतर तेथे असणाऱ्या प्रेक्षकाला मारहाण प्रकरणांमध्ये वर्तक नगर पोलिसांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ( case registered against 100 workers ) केला आहे. या गुन्ह्यामध्ये दंगल माजवणे आणि मारहाण करणे इत्यादी कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad ) आणि त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांनी सिनेमा बंद पाडून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी मॉल प्रशासनाला विनंती करून हा सिनेमा पुन्हा एकदा सुरू केला. दरम्यान झालेल्या मारहाणीच्या प्रकारामुळे वर्तक नगर पोलिसांनी कारवाई करत हा गुन्हा दाखल केलेला आहे.
Jitendra Awad : प्रेक्षकाला मारहाण; जितेंद्र आव्हाड यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
हर हर महादेव सिनेमाचा शोबंद ( Showband of Har Har Mahadev movie ) पाडल्यानंतर तेथे असणाऱ्या प्रेक्षकाला मारहाण प्रकरणांमध्ये वर्तक नगर पोलिसांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ( case registered against 100 workers ) केला आहे.
मनसेकडून मोफत 'शो'चे आयोजन :हर हर महादेव या सिनेमावरून राष्ट्रवादी आणि मनसे आमने-सामने आली असताना आता ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हर हर महादेव या सिनेमाचा एक मोफत शो ठेवण्यात आलेला आहे नागरिकांनी हा सिनेमा पहावा असे आवाहन मनसेकडून करण्यात आलेला आहे.
अशी घडली घटना :राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सिनेमावर टीका करत ठाण्याच्या विवियाना मॉलच्या थिएटरमध्ये सुरू असलेला हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडला आहे. शो बंद करत प्रेक्षकांना थिएटरच्या बाहेर काढले. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सिनेमा थांबवून प्रेक्षकांना बाहेर जाण्यास सांगितले तसेच सिनेमा न पाहण्याचे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे. नुकताच पुण्यातही हर हर महादेव सिनेमात 4 शो संभाजी ब्रिगेडकडून रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता ठाण्यातही राष्ट्रवादीकडून सिनेमाला तीव्र विरोध होतोना दिसत आहे.