महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cracks On Kasara Ghat: कसारा घाटातून प्रवास करताना सावधान! रस्ता खचतोय, महामार्गाला तडे - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

मुंबई नाशिक महामार्गाला तडे गेले आहेत. मागील वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून दुरुस्ती पण केली. पण निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारामुळे आज पुन्हा कसारा घाटातील रस्त्याला तडे गेले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( National Highway Authority ) संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून प्रवशांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.

Kasara Ghat cracks
कसारा घाटाला तडे

By

Published : Jul 17, 2022, 3:30 PM IST

ठाणे -मुबई-नाशिक महामार्गांवरील ( Mumbai-Nashik Highway ) कसारा घाटातील रस्ता खचत चालला असून महामार्गांवर काही अंतरा वरील रस्त्याला पूर्णत: तडे गेले असून रस्ता दबला गेला आहे. रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कथडे देखील रस्ता सोडून बाजूला सरकल गेले आहेत. त्यामुळे घाटातून प्रवास करताना चालकांना सावधानी बाळगण्याचे गरजे झाले असून मुबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या महामार्गांवरील मुबई नाशिक दरम्यान च्या जुन्या कसारा घाटाची ( Kasara Ghat ) निकृष्ठ दर्जाची काम व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची पूर्ण बिकट वाट बनत चालली आहे ( Kasara Ghat Road In Bad Situations ).

कसारा घाटाला तडे

कथडे रस्त्याचा एकसंध पणा सोडून पडले बाजूला -पावसाळा झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंपनी व एका ठेकेदाराने करोडो रुपये खर्च करुन दोन्ही रस्त्याचे भराव करुन तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली ( Damaged Part Repaired ). परंतु, याही वर्षी करणार जुन्या कसारा घाटात रस्त्याला तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते. त्याच ठिकाणी रास्त्याला मोठे तडे गेले आहेत. 500 मिटरच्या अंतरावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेले आहेत ( Cracked Roads ). शिवाय रस्त्यांच्या कडेला रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी जाळी बांध पद्धतीचे व सिमेंट आर.सी.सी.चे वरच्यावर संरक्षण कठडे( Protection Wall ) संबंधित ठेकेदार कंपनीने बांधले होते. ते सुद्धा 1 ते दीड फुट खाली दबले गेले आहेत. तर काही कठडे रस्त्याचा एकसंधपणा सोडून बाजूला पडले आहेत.

खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना गरजेचे -जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहणांमुळे रस्त्याला मोठी हानी पोहचून्यची शक्यता नाकारता येत नाही. कोसळणारा पाऊस व वाहनांच्या कम्पिंगमुळे महामार्गांवरील रस्ता जास्त प्रमाणात खचण्याची शक्यता असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करुन 1 किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरु ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा, दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा -Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

ABOUT THE AUTHOR

...view details