ठाणे - पत्नीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला पती बडोदा जेलमधून पॅरोलवर १९९९ साली बाहेर आला. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत, तब्बल २२ वर्ष उल्हासनगर शहरात राहत ( Accused Absconding Killing His Wife ) होता. मात्र, गुन्हे शाखा पथकाला त्याची माहिती मिळताच आज ( सोमवार ) पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली ( Criminal Arrested Crime Branch Ulhasnagar ) आहे. रमेश उर्फ दिनेश उत्तम तायडे ( वय ५३ ) असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे.
घरगुती वादातून पत्नीला जाळले जिवंत
आरोपी रमेश उर्फ दिनेश तायडे हा गुजरात राज्यातील सुरत शहरात पत्नीसह राहत होता. त्यातच १९९५ साली पती पत्नीमध्ये घरगुती वाद झाले होते. त्याच वादातून त्याने पत्नीला जिवंत जाळले. त्यावेळी सुरत शहरातील लिबांयत पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवि. कलम ४९८(अ) ए, ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती. त्यानंतर सुरत न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे. तेव्हापासून तो गुजरात राज्यातील बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता. पण, जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्याला २७ सप्टेंबर १९९९ रोजी पॅरोलवर रजा मिळाली होती. त्यानंतर रजा संपली तरी तो पुन्हा जेलमध्ये हजर न होता फरार झाला होता.