ठाणे - एका लेडीज बारमध्ये (Thane Ladies Bar) झालेल्या जुन्या भांडण्याच्या वादातून एका बारबालेला तीन बारबालांनी बारमध्ये बेदम मारहाण केली. तसेच तिच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याची (Barbala smashed beer bottle) घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमधील ओटी सेक्शन परिसरातील एकी लेडीज बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात हल्लेखोर बारबालांच्या त्रिकुटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्या तिघीही फरार झाल्या आहेत. नंदिनी , जहान , पुतुल असे गुन्हा दाखल झालेल्या बारबालांची नावे आहेत. तर रेखा असे जखमी बारबालाचे नाव आहे.
बारबालाच्या डोक्यात फोडली दुसऱ्या बारबालांनी बियरची बाटली; बारबाला गंभीर - ulhasnagar ladies bar crime news
एका लेडीज बारमध्ये (Thane Ladies Bar) झालेल्या जुन्या भांडण्याच्या वादातून एका बारबालेला तीन बारबालांनी बारमध्ये बेदम मारहाण केली. तसेच तिच्या डोक्यात बियरची बाटली फोडल्याची (Barbala smashed beer bottle) घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमधील ओटी सेक्शन परिसरातील एकी लेडीज बारमध्ये घडली आहे.
डोक्यात फोडली काचेची बाटली -उल्हासनगर शहरातील ओटी सेक्शन भागात एक लेडीज बार आहे. या बारमध्ये तीन दिवसापूर्वी बार मॅनेजर शाम सेठ यांच्या वाढदिवसा निमित्ताने बारमधील वेटर, बारबाला आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी बारबाला रेखाची नंदिनी, जहान, पुतुल या तिघींसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. मात्र, एकाच बारमध्ये कामाला असल्याने रेखाने त्यावेळी पोलिसात तक्रार दिली नव्हती. त्यातच काल मध्यरात्रीच्या सुमारास रेखा बारमधील बाथरूममध्ये गेली असता, जुना वाद उकरून काढत त्या तिघींनी रेखाला शिवीगाळ करत तिच्या डोक्याचे केस पकडून तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर अचानक हल्लेखोर नंदिनीने काचेची बाटली रेखाच्या डोक्यात फोडल्याने तिला गंभीर दुखापत झाली.
रुग्णालयात उपचार सुरू - सध्या रेखावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तिघीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिघी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.