महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक - बारबाला

कल्याण अप्पर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे. या विशेष पोलीस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंंतर ही कारवाई करण्यात आली.

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक करण्यात आली आहे

By

Published : Aug 28, 2019, 8:23 AM IST

Updated : Aug 28, 2019, 9:46 AM IST

ठाणे -वादग्रस्त असलेल्या चांदणी बारमधून ऑर्केस्ट्राच्या तालावर मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या 22 बारबालांसह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदणी ऑर्केस्ट्रा बारमध्ये घडली.

चांदनी बारमध्ये अश्लील नृत्य करताना 22 बारबालांसह मॅनेजर अटक करण्यात आली आहे

कल्याण अप्पर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ही छापेमारी केली आहे. या विशेष पोलीस पथकाला खबर मिळाली होती, की उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या चांदनी बारमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या नावाखाली मद्यपी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारबाला तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करत आहेत. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या पोलीस पथकाने या बारवर छापा मारला.

हेही वाचा - ठाण्यात जुगाराच्या अड्ड्यावर छापा; १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, ८३ जुगाऱ्यांना अटक

छापेमारी दरम्यान 22 बारबालांना स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी चांदनी बारचा मॅनेजर त्यांच्याकडून लाइव्ह ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील हावभाव करून नृत्य करत असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी चांदनी बारच्या मॅनेजरसह 22 बारबालांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा - भायखळ्यातील माजगावच्या मुस्तफा बाजार येथील लाकूडपाटात भीषण आग...

दरम्यान, उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रा बार आहेत. त्या बारमध्येही अश्लील कृत्य स्थानिक पोलिसांची मेहरनजर असल्यानेच सुरू असल्याची चर्चा वादग्रस्त चांदनी बारच्या छाप्यामुळे नागरिक करता आहेत.

Last Updated : Aug 28, 2019, 9:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details