ठाणे - अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने केला २६ वर्षीय बारबालेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिच्याच बांगलादेशी प्रियकराने हा खून केला आहे. खुनाची ही घटना कळंबोली येथील रोडपाली मध्ये घडली आहे. लिपी शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
गावाला गेलेल्या मैत्रीणी घरी आल्या असता खुनाचा झाला उलगडा-
अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रियकराने केला बारबालेचा खून.. - बांगलादेशी बारबालेचा खून
अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून बारबालेचा खून झाल्याची घटना कळंबोलीमध्ये घडली आहे. तिच्या प्रियकरानेच ही हत्या केली आहे. आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे

काजल लाले, सलमा मिया व लिपी शेख या तिघी रहात रोडपाली कळंबोली येथे भाड्याने घर घेऊन राहत होत्या. दरम्यान काजल आणि सलमा या काही दिवसांसाठी गावी गेल्या होत्या, तेथून त्या पुन्हा रोडपाली येथील घरी आल्या असता, घराला बाहेरून टाळे होते. त्यामुळे त्यांनी घरमालक अक्षय गायकवाड यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता, लिपी शेख (26)या बांगलादेशी बारबालेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या संदर्भात अक्षय याने कळंबोली पोलीसांना कळविले व याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.