ठाणे -पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असून आता या पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याचाच निषेध करण्याकरता ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने '१०० नाॅट आऊट' असा भला मोठा बॅनर लावला आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरड मोडले आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाण्यात हे बॅनर लावले आहेत. 'MAN OF THE MATCH पेट्रोल 100* नॉट आऊट अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!', असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. ठाण्यातील हरी निवास चौकात हे बॅनर लावले गेले आहेत. या आधीदेखील पेट्रोल दरवाढी विरोधात बैलगाडी आंदोलन, सायकल आंदोलन, तर गाडी खिचो आंदोलन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने ठाण्यात केले आहेत.