ठाणे - गर्भपात गोळ्यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी असूनही राजरोसपणे भिवंडीतील मेडिकल मधून विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे डॉक्टारांच्या परवानगी शिवाय राज्यात गर्भलिंगनिदान व गर्भपात गोळ्यांच्या विक्रीस बंदी आहे. तरीही असा प्रकार समोर आल्याने राज्य सरकाराच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा दिसून आला आहे.
गर्भपाताच्या गोळ्या ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत विक्री ..
धक्कादायक ! भिवंडीत बंदी असूनही गर्भपाताच्या गोळ्यांची राजरोसपणे विक्री... - medical abortion
राज्यशासनाच्या आरोग्य विभागाकडून बंदी असलेल्या गर्भापाताच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. एका व्यक्तीने याबाबतचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.
या गोरखधंद्यावर वैद्यकीय विभागासह पोलीस यंत्रणा व प्रशासनाचे कोणताही धाक नसल्याने या प्रकारातून समोर येत आहे. गरजू ग्राहकांना गर्भपाताच्या गोळ्या सहजपणे उपलब्ध होत आहेत. या गोळ्या ३०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंत विक्री जात असल्याचे एका दक्ष नागरिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले आहे. त्या दक्ष नागरिकाने हा व्हिडिओ समाजमाध्यवर व्हायरल केला आहे. त्यामुळे आता तरी बेकायदा गर्भपाताच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात गर्भलिंगनिदान व गर्भपाताच्या घटना-
काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात डॉक्टर मुंडे यांच्या रुग्णालयात घडललेल्या शेकडो गर्भलिंगनिदान व गर्भपाताच्या धक्कादायक घटनेनंतर गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित महिलांचा गर्भपात करणाऱ्या गोळ्यांवर सरकारने बंदी घातली होती. तरी देखील काही औषध विक्रीच्या दुकानातून तसेच वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक व्यक्तींनी सध्या गर्भपाताच्या गोळ्या विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याची खळबळजनक घटना घडतच आहे.