ठाणे- घरफोडी, वाहन चोरी आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलीस पथकाने ३ आरोपींना पकडले असून त्यांच्याकडून तब्बल २८ गुन्ह्यांची उकल करीत ४२५ ग्रॅम सोन्याचे दागिने, सात दुचाकी, दोन मोबाईल आणि घरफोडीतील सिगरेट असा १८ लाख ४७ हजार ८७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भुयार खोदून बँक लुटणाऱ्या टोळीतील म्होरक्याला भिवंडीतून अटक; ३ आरोपींकडून २८ गुन्ह्यांची उकल - arrested
विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भूयार खोदून लॉकरमधील मुद्देमाल चोरीतील प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्राला भिवंडीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे
विशेष म्हणजे नवी मुंबई येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत भूयार खोदून लॉकरमधील मुद्देमाल चोरीतील प्रमुख सूत्रधार दीपक दयाराम मिश्राला भिवंडीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रमुख सूत्रधार आणि सराईत गुन्हेगार दीपकने फरार असलेल्या काळात अनेक ठिकाणी केलेल्या इतर ५ घरफोडीच्या घटनांची उकल त्याच्या अटकेने झाली असून त्याच्या जवळून २०३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
नारपोली येथील एका चैन स्नॅचिंगच्या घटनेचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुरी नगर भिवंडी येथील पपलु इम्तियाज अन्सारी या आरोपीस अटक केली. नागाव भिवंडी येथील इमरान उर्फ इसाक इस्माईल शेख या सराईत वाहन चोरासही अटक केली असून त्याच्याकडून नारपोली, शांतीनगर, मुंब्रा, श्रीनगर, हिललाईन या पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या सात वाहन चोरीचा छडा पोलिसांनी लावला आहे. भिवंडी गुन्हे शाखेचे शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी पथकाने मिळून एकूण २८ गुन्ह्यांची उकल केली.