महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bank Account Fraud : १६ हजार कोटीचं हॅकिंग लूट प्रकरण; बनावट दस्तावेजावर बँक खाती उघडणाऱ्या आरोपीला अटक

Bank Account Fraud : ठाण्यात नुकताच उघडकीस आलेल्या बेकायदेशीर १६ हजार कोटींच्या हॅकिंग गैरव्यवहार (Crore hacking loot case) प्रकरणात श्रीनगर पोलीस आणि नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पहिली अटक झाली आहे. (opening of bank accounts on fake documents) नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हवे असलेल्या पाच आरोपींपैकी अमोल मनोहर आंधळे उर्फ अमन या फरारी आरोपीला नौपाडा पोलिसांनी ठाण्यातून बुधवारी रात्री अटक केली आहे. (Money Fraud Case)

Bank Account Fraud
बॅंक फ्रॉड केस

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 3:46 PM IST

ठाणे Bank Account Fraud :नौपाडा पोलीस ठाण्यात लोकांच्या कागदपत्रांवर शेकडो बँकांची बनावट खाती उघडून त्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यवहाराबाबत दाखल दोन गुन्ह्यात अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संजय सिंग, अमोल आंधळे उर्फ अमन, केदार समीर दिघे, जितेंद्र पांडे यांचा समावेश असून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. अखेर पहिली अटक करून आरोपीला गजाआड करण्याची कामगिरी नौपाडा पोलिसांनी केली. आता या अटकेनंतर मात्र अनेक गोष्टींचा खुलासा आणि अनेक नावांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तर एवढ्या मोठ्या रक्कमेची देवाण-घेवाण बाबतच्या कार्यपद्धतीचा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखा सायबर सेल नौपाडा पोलीस हे एकत्रितरीत्या तपास करत आहेत.

गुन्हे तपास सायबर विभागाकडे :नौपाडा आणि श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर सेल विभागाकडे आहे. श्रीनगर पोलीस ठाण्यात गेटवे पे कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करून तथाकथित व्यवहार आरोपींनी केला. तर नौपाडा पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने बोगस दस्तावेजावर बँक खाती उघडून आरोपींनी व्यवहार करत रक्कम परदेशात पाठवली.

अमोल आंधळे फरार आरोपी :नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाच आरोपींपैकी एक आरोपी अमोल मनोहर आंधळे उर्फ अमन याला बुधवारी (११ ऑक्टोबर) रोजी रात्री अटक केली. आरोपी अमोल आंधळे हा नौपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरारी होता. तो नौपाडा परिसरात फिरताना आढळला असता पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. तर याच गुन्ह्यातील फरारी अन्य चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट दस्तावेजांच्या आधारावर बॅंक खाती उघडण्याची प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. असंच एक प्रकरण जुलै, 2022 रोजी मुंबईत उघडकीस आलं होतं. या खात्यांचा वापर हवाला रकमेची अफरातफर करण्यासाठी केला जात होता. आर्थिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली होती.

हेही वाचा:

  1. सैन्यात नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक, शिवाजी विद्यापीठाच्या पहारेकऱ्यांवर गुन्हा दाखल
  2. Online Money Fraud ऑनलाईन कामातून पैसे कमावण्याच्या मोहापायी गमावले लाखो रुपये
  3. Mumbai Crime : इन्शुरन्स पॉलिसीबाबत आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक

ABOUT THE AUTHOR

...view details