ठाणे- कोरोना काळात अनेक व्यवहार सुरू झालेत. मात्र, मंदिरे अजूनही उघडण्यात आलेली नाहीत. यासाठी भाजपने आंदोलने केली होती. मात्र, सरकारने अद्याप याप्रकरणी काही निकाल दिलेला नाही. त्यामुळे, आता भाजपनंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नौपाडा येथील गावदेवी मंदिरात उपरोक्त दोन्ही पक्षांतर्फे भजन किर्तन-आंदोलन करण्यात आले.
ठाण्यात बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेचे भजन-किर्तन आंदोलन, मंदिरे उघडण्याची मागणी
दोन्ही पक्षांकडून मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारविरोधात निदर्शने देण्यात आली. यावेळी, ठाकरे सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावी, अन्यथा येत्या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आपल्या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडणार, असा इशारा विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आला आहे.
बजरंग दल-विश्व हिंदू परिषदेचे भजन किर्तन आंदोलन
दोन्ही पक्षांकडून मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली. तसेच, सरकारविरोधात निदर्शने देण्यात आली. यावेळी, ठाकरे सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडावी, अन्यथा येत्या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आपल्या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडणार, असा इशारा विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आला आहे.
हेही वाचा-एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील एंट्रीचे वाहतूक पोलिसांनेही केले स्वागत