महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलापूरमध्ये सापडले २ लाख ५८ हजारांचे चरस; अज्ञाताविरुद्ध गु्न्हा दाखल - thane police

बदलापूर पूर्व पोलिसांना एका इमारतीमधील बाल्कनीत 2 लाख 58 हजार रूपये किमतीचा चरस हा अमली पदार्थ मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

बदलापूर पूर्व पोलीस ठाणे

By

Published : Nov 10, 2019, 5:16 PM IST

ठाणे -बदलापूर पूर्व पोलिसांना एका इमारतीमधील बाल्कनीत 2 लाख 58 हजार रूपये किंमतीचा चरस हा अमली पदार्थ मिळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाच - मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल

बदलापूर पूर्व येथील कात्रपरोड परिसरातील एका इमारतीमध्ये उघडया बाल्कनीत एक पिशवी ठेवण्यात आली असल्याची माहिती तेथील नागरिकांना समजले. ही माहिती एका महिलेने बदलापूर पूर्व पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तर त्यांना एका पिशवीत 1 किलो 32 ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ आढळून आला. सुमारे 2 लाख 58 हजार रूपये किमतीचा चरस असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी तो चरस ताब्यात घेतला असून कोणीतरी अज्ञात इसमाने तो चरस त्या ठिकाणी आणून ठेवला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी अधिक तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

हेही वाचा - भाजप नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details