ठाणे - अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून 13 लाखांची रोकड चोरांनी लंपास केल्याची घटना शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी चोरांविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडून चोरटयांनी केली १३ लाखांची रोकड लंपास - shahapur police
मुंबई-नाशिक महामार्गापासून आसनगाव गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, तसेच सुरक्षा रक्षक देखील नसल्याने चोरट्याने संधी साधून गुरुवारी रात्री एटीएमच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला व एटीएममधील रकमेचा बॉक्स फोडला.
मुंबई-नाशिक महामार्गापासून आसनगाव गावातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. एटीएमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता, तसेच सुरक्षा रक्षक देखील नसल्याने चोरट्याने संधी साधून गुरुवारी रात्री एटीएमच्या बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला व एटीएममधील रकमेचा बॉक्स फोडला. तब्बल १३ लाख एक हजार ७०० रुपये घेऊन चोरांनी पोबारा केला आहे.
एजीएस या कंपनीला कॅमेरा व वॉचमनची व्यवस्था करणे एटीएममध्ये पैसे भरणे व तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे आदी कामाचा ठेका देण्यात आला होता. या कंपनीचे व्यवस्थापक गौतम परिहार यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.