ठाणे- सोलापूरसह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी रात्री नऊ वाजता लाईट बंद केल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनीटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलचे टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.
जितेंद्र आव्हाडांसह ठाणे आणि सोलापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाही लावलेत दिवे - जितेंद्र आव्हाड
सोलापूरसह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी रात्री नऊ वाजता लाईट बंद केल्या नाहीत. पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनीटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलचे टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाचे पालन न करण्याचे आवाहन केले होते. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यकर्त्यांना दिवे न लावण्याचे आणि जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाला काही ठिकाणी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तर, काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी तर लोकांनी दिवे पेटवण्यासह फटाके फोडून दिवाळी साजरी केली. अशा या फटाके फोडण्यामुळे काही ठिकाणी आगी लागल्याच्या घटनाही समोर येत आहे.