ठाणे :नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागांना दूध पाजण्याची प्रथा आहे. मात्र दूध सापांसाठी घातक असते. या पार्शवभूमीवर कल्याण मधील नूतन विद्या मंदिर शाळेतील चिमुकल्या विध्यार्थ्यांमध्ये वॉर फाऊंडेशन व शाळा प्रशासनाच्या वतीने विविध सापांविषयी जनजागृती करण्यात आली.
कल्याणमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध सापांविषयी जनजागृती - कल्याण नागपंचमी बातमी
जनजागृती कार्यक्रमाच्या सुरवातीला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्य प्रवेशदारात मातीचे वारूळ तयार करून त्यामध्ये मातीच्या नागांच्या प्रतिमेसह विविध सापांचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्प मित्रांनी विविध प्रजातीच्या सापाबद्दल माहिती देण्यात आली . सापाबद्दल पसरलेल्या अंधश्रध्दाबाबतही चिमुकल्यामध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्यने चिमुकल्या विद्यार्थ्यांची उपस्थित दिसून आली आहे.

नागांच्या प्रतिमेसह विविध सापांचे पूजन -कल्याण मधील वॉर फाऊंडेशनचे सर्पमित्र प्रेम आहेर यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी सणाचे महत्व सांगून त्यांच्यामध्ये सापांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी एका वर्गात ऑनलाईन प्रोजेक्टरवर विविध सापांविषयी माहिती देण्यात आली. तर जनजागृती कार्यक्रमाच्या सुरवातीला चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्य प्रवेशदारात मातीचे वारूळ तयार करून त्यामध्ये मातीच्या नागांच्या प्रतिमेसह विविध सापांचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्प मित्रांनी विविध प्रजातीच्या सापाबद्दल माहिती देण्यात आली . सापाबद्दल पसरलेल्या अंधश्रध्दाबाबतही चिमुकल्यामध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्यने चिमुकल्या विद्यार्थ्यांची उपस्थित दिसून आली आहे.