ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर ( Abhijit Bangar New Commissioner ) यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीसाठी काल प्रधान सचिव विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची स्वाक्षरी होती. ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त विपिन शर्मा यांच्याकडून आज अविनाश बांगर यांनी पदभार स्वीकारला. याआधी अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करणार असल्याची ग्वाही यावेळी नवनियुक्त आयुक्तांनी दिली.
परिस्थिती हाताळता आली नसल्याने तडकाफडकी बदली : डॉ.विपीन शर्मा यांनी जून २०२० रोजी ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता तो काळ कोरोनाचा होता तत्कालीन आयुक्तांना परिस्थिती हाताळता आली नसल्याने तडकाफडकी बदलण्यात आले होते. त्यावेळी योग्य नियोजन करून त्यांनी ठाणे शहरात अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा कहर आटोक्यात आणला. मात्र अवघे दोन वर्ष ३ महिनेच ते ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी राहिले.