ठाणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे येथे कडक पोलिसांचा पहारा तैनात करण्यात आला. तरिही शुक्रवारी मुंब्र्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला. नागरिक अजूनही कोरोनाचे संकट गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत, असे म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांवर संताप व्यक्त केला.
आव्हाड मुंब्रावासियांवर संतापले; म्हणाले, मरायला तयार असलेल्यांना कोणीच वाचवू शकत नाही - ठाणे कोरोना बातमी
मुंब्र्यातील अमृतनगर येथे शुक्रवारी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रावासीयांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनी अत्यंत कडक भाषेत येथील नागरिकांच्या चाललेल्या मनमानीचा समाचार घेतला. आपण मरायलाच तयार असलो तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही अशा शब्दात त्यांनी सुनावले.

हेही वाचा-मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
मुंब्र्यातील अमृतनगर येथे शुक्रवारी पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रावासीयांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यांनी अत्यंत कडक भाषेत येथील नागरिकांच्या चाललेल्या मनमानीचा समाचार घेतला. आपण मरायलाच तयार असलो तर आपल्याला कोणीच वाचवू शकत नाही अशा शब्दात त्यांनी सुनावले. आजही नागरिकांमध्ये या कोरोनाबद्दल अनभिज्ञता असून अजूनही कोणी घरी बसायला तयार नाहीत. थातुरमातूर कारणे काढून युवा पिढी रस्त्यांवर गाड्या चालवताना दिसत आहे. हे पाहून आपल्याला खूप वेदना होत असल्याचे त्यांनी फार उद्विग्नपणे सांगितले.