ठाणे -जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्यासाठी तंत्र-मंत्र हा अघोरी प्रकार करणाऱ्या दोघांना जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. या प्रथेचा प्रयोग एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड व जव्हार हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.
अनिष्ट व अघोरी प्रथांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक -
कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत व्हावी, यासाठी अनिष्ट अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वापरकर्त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या अगोदरही मिळाल्या आहेत एकनाथ शिंदेंना धमक्या -