महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लास्टिक खुर्ची मोडल्याच्या वादातून शेजाऱ्यावर सुरीने हल्ला, दोन भावांविरोधात गुन्हा दाखल - Thane Crime News

शेजाऱ्याकडून चुकून लाकडी दांडक्याने प्लास्टिकची खुर्ची मोडली. मात्र याचा राग मनात धरून दोन सख्या भावांनी या शेजाऱ्यावर सुरीने हल्ला केला. या हल्ल्यात हा शेजारी गंभीर जखमी झाला आहे. महादू खांडवी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या वक्तीचे नाव आहे.

Attack on neighbor thane
प्लास्टिक खुर्ची मोडल्याच्या वादातून शेजाऱ्यावर हल्ला

By

Published : Nov 17, 2020, 5:19 PM IST

ठाणे -शेजाऱ्याकडून चुकून लाकडी दांडक्याने प्लास्टिकची खुर्ची मोडली. मात्र याचा राग मनात धरून दोन सख्या भावांनी या शेजाऱ्यावर सुरीने हल्ला केला. या हल्ल्यात हा शेजारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना अंबरनाथ तालुक्यातल्या कुशीवली गावात घडली. महादू खांडवी असे या हल्ल्यात जखमी झालेल्या वक्तीचे नाव आहे. तर काशिनाथ भगत आणि शत्रुगन भगत असे या हल्लेखोर भावांचे नाव आहे. या प्रकरणी हिलनाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुत्र्याला मारताना चुकून लाकडी दांडक्याचा फटका बसला खुर्चीवर

महादू खांडवी हे अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली गावात पत्नीसह राहतात. त्यांच्याच शेजारी हल्लेखोर भगत कुटूंबही राहते. काल रात्री ९ वाजता महादू हे अंगणात फेरफटका मारत असताना, एक भटका कुत्रा त्यांच्या अंगणात आला. या कुत्र्याला हाकलण्यासाठी त्यांनी लाकडी दांडके हातात घेतले. मात्र कुत्रा पळाल्याने या दांडक्याचा फटका खुर्चीला बसला आणि खुर्ची मोडली. ही प्लास्टिक खुर्ची मोडल्याने महादू यांनी शेजारी राहणाऱ्या भगत कुटुंबाला नवीन प्लास्टिक खुर्ची आणून दिली. मात्र या दोघांनी खुर्ची मोडल्याचा राग मनात धरून महादू खांडवी यांच्यावर हल्ला केला. तर पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीला देखील मारहण करण्यात आली.

हेही वाचा -दादर : दारूच्या व्यसनामुळे लग्नास नकार दिल्याने तरुणीवर प्रियकराकडून चाकूहल्ला

हेही वाचा -नागपुरात दुहेरी हत्याकांड.. अन्यत्र खून करून मृतदेह नागपूर-कुही मार्गावर फेकले !

ABOUT THE AUTHOR

...view details