महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंवर घरात घुसून हल्ला; हल्लेखोर निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांवर गुन्हा दाखल - निलंबित प्राध्यापक संजय जाधव

Attack On Vice Chancellor : मुंबई विद्यापीठाचे ८४ वर्षीय माजी कुलगुरूंवर घरात घुसून निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोडवरील प्रधान बंगल्यात घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ६ हल्लेखोरांविरुधात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. डॉ. अशोक प्रधान असं हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी माजी कुलगुरूंचे नाव आहे. तर निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय 50), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय 32), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.

Mahatma Phule Station
६ जणांवर गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 10:25 PM IST

ठाणेAttack On Vice Chancellor : डॉ. अशोक प्रधान हे मुंबई विद्यापीठातून निवृत्तीनंतर ते गेल्या काही वर्षांपासून समिती सदस्य म्हणून दुसऱ्या शिक्षण समितीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी त्या शैक्षणिक संस्थेतील हल्लेखोर प्राध्यापकाचे गैरवर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळं त्यांना कामावरून निलंबित केलं होतं. त्यामुळं प्राध्यापकाचे वेतन घेणाऱ्या आरोपीचे वेतन बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता.



नोकरीवर घेण्यास दिला नकार: याच वादातून रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुख्य आरोपी इतर चार जणांसह प्रधान यांच्या बंगल्यात गेले होते. त्यावेळी बंगल्यात आरोपी प्राध्यापकाने मला नोकरीची खरोखरच गरज आहे. म्हणून मला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्या. अशा तगादा डॉ. प्रधानकडे लावला होता. त्यावेळी प्रधान आणि त्यांची पत्नी बंगल्यात होते. मात्र डॉ. प्रधान यांनी नोकरीवर घेण्यास नकार दिल्यानं वाद होऊन काही क्षणातच आरोपी जाधव यांनी त्याच्यावर हल्ला केला.



हल्लेखोरांवर गुन्हा दाखल: डॉ. प्रधान यांच्या पत्नीने ताबडतोब पोलिसांना बोलावलं, त्यानंतर महात्मा फुले पोलिस स्टेशनचे एक पथक प्रधान यांच्या बंगल्यावर पोहोचले, त्यांना रुग्णालयात नेलं. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. दुसरीकडं महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम 143, 147, 452, 341, 504, 34 अन्वये सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्याशी संपर्क साधला असता, डॉ. प्रधान यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी आरोपी जाधव यांना त्यांच्या अव्यावसायिक वर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळं त्यांच्या कामावरून निलंबित केलं आहे. त्यामुळं जाधव यांचा पगार अचानक बंद झाल्यानं त्यांना आर्थिक फटका बसल्यानं त्यांनी याच वादातून हल्ला केल्याचं सांगितलं. तसेच आरोपीना सीआरपीएस ४१, १(अ) प्रमाणे नोटीस बजावली आहे. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे करत आहे.



हेही वाचा -

  1. Dr Bhalchandra Mungekar News : आयआयटी मुंबईवर हल्ला म्हणजे पंडित नेहरू यांच्या विचारांवर हल्ला -भालचंद्र मुणगेकर
  2. Mumbai Crime News : अंधेरी पोलिसांवर जीवघेणा हल्ला; हल्ल्यात १० पोलीस गंभीर जखमी
  3. Israel Hamas War : पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला, अंगरक्षक ठार

ABOUT THE AUTHOR

...view details