ठाणे :मुरबाड शहरानजीक असलेल्या डोहळ्याचा पाडा येथिल फार्म हाऊसवर हि घटना घडली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून फरार हल्लेखोर भरत मधुकर हरड याचा शोध सुरु केला आहे. तर चंदना चेतन बांगर वय 32 असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या आईचे नाव आहे. तर श्रावणी चेतन बांगर वय 6 असे गंभीर जखमी असलेल्या मुलीचे नाव असून या हल्ल्यात शेजारील सुरक्षा रक्षक पन्नालाल यादव वय 50 हाही जखमी झाला आहे. मात्र या घटनेने संपूर्ण मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कोयत्याने वार करत घटनास्थळावरुन पसार :याबाबत सविस्तर वृत्त असे की, बारवी धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या तोंडली येथिल चेतन बांगर हे मुरबाड शहरानजिक असणाऱ्या डोहळ्याचा पाडा येथील एका नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर मृत पत्नी चंदना आणि मुलगी श्रावणी यांच्यासह वास्तव्य करीत होते. त्यातच हल्लेखोर हा चहा पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला होता. त्यानंतर अचानक त्याने मृत चंदनाकडे १० हजार रुपयांची मागणी केली. त्या आदीच बेडरूंममध्ये खेचुन घेऊन जात चंदना यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. आईचा आरडाओरडा एकूण मुलगीही आईला वाचविण्यासाठी आली असता, हल्लेखोराने दोघी माय लेकीवर कोयत्याने सपासप वार केले. तर दुसरीकडे मायलेकींचा आक्रोश पाहून शेजारी असलेल्या फार्म हाऊसवरील सुरक्षा रक्षकाने घटनास्थळी धाव घेत, हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर भरतने सुरक्षा रक्षक पन्नालाल यादव याच्याही हातावर कोयत्याने वार करत घटनास्थळावरुन पसार झाला.